प्रतिनिधी / कुडचडे
शिरफोड, कुडचडे येथील जुवारी नदीच्या पात्रात शनिवारी संध्याकाळी उडी घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह रविवारी कुडचडे पोलिसांकडून अग्निशामक दलाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या शोधकार्यात सापडल्याची माहिती पोलीस स्थानकातून प्राप्त झाली. अधिक माहितीनुसार, सदर मृतदेह मडगावस्थित व्यावसायिक संतोष बाबुराव कुंगुरी (वय 47) याचा आहे. त्याचा शनिवारी घटनास्थळी मोबाईल व चप्पल सापडल्यामुळे त्यानेच नदीत उडी मारलेली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता. रविवारी मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांकडून खात्री करण्यात आली. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.