बेळगावात प्रचंड खळबळ, लॉकडाऊन अधिक कडक
प्रतिनिधी / बेळगाव
नवी दिल्ली येथील निजामुद्दिन परिसरात झालेल्या धर्मसभेत भाग घेवून बेळगावला परतलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी धारवाड येथे ही माहिती दिली असून जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप यासंबंधीचा खुलासा केला नाही. बेळगाव शहर, बेळगुंदी व हिरेबागेवाडी येथील तिघा जणांचा यामध्ये समावेश आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. या तिघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात असणाऱयांचाही शोध घेवून त्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सकाळीच तपासणी अहवाल उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्या निवासस्थानी जिह्यातील वरिष्ट अधिकाऱयांची बैठक झाली. लागण झालेल्यांमध्ये 20 ते 25 वर्षातील दोघा जणांचा व 70 वर्षांच्या एका वृध्दाचा समावेश आहे. निजामुद्दिनहून परतलेल्या 62 जणांपैकी 33 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सध्या तिघा जणांचा अहवाल पॉझिटीक्ह आला आहे.