बेळगाव : मराठा मंदिर येथे 13 मार्च रोजी ‘शगुन’ यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘विव्हर्स वर्क’ या साडी प्रदर्शनास बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात देशाच्या विविध भागातून आलेल्या साडय़ा मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कर्नाटकच्या पेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, बिहारच्या ऑरगॅनिक टसर सिल्क, तामिळनाडूच्या कांजीवरम, बेंगळूर जामदानी यांच्या बरोबरच आंध्रप्रदेशच्या प्युअर उपारा सिल्क, प्युअर रॉ सिल्क व वजनाला हलक्मया असलेल्या कूपडम सॉफ्ट सिल्क, महाराष्ट्राच्या पैठणी साडय़ा व डेस मटेरियल उत्तर प्रदेशच्या लखनवी चिकन जामवार सिल्क आणि सिफॉन सिल्क साडय़ा, ओरिसाची संबलपुरी कॉटन साडय़ा, मध्यप्रदेशच्या महेश्वरी चंदेरी सिल्क आणि पश्चिम बंगालच्या बलुचारी कंटा साडय़ा, आसामच्या मुगा सिल्क साडय़ा याबरोबरच काश्मीरमध्ये हाताने बनविण्यात आलेल्या स्वीड लेदर बॅग्ज, पश्चिना शॉल, मलबेरी सिल्क, कानी शॉल, छत्तीसगडच्या हँडमेड तसर सिल्क, रॉ सिल्क, एरी सिल्क, कोसा सिल्क भागलपूरच्या भारत व भारताबाहेर शोरूम असलेल्या भारत हँडलूम्स यांच्या साडय़ा ठेवण्यात आल्या आहेत.
याशिवाय फरीदाबाद येथे बनविण्यात आलेल्या मातीच्या वस्तू उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये फाउंटन, तबले, वेगळय़ा प्रकारच्या मूर्ती, वॉल हँगिंग, प्लांटर व फ्लावर प्लॉट्स चा समावेश आहे शिवाय काचेच्या सुंदर वस्तू, बांगडय़ा काचेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद येथून आणून ठेवण्यात आल्या आहेत.
महिलांच्या पादत्राणे उत्पादनात अग्रेसर असलेल्या पंजाबमध्ये बनवलेले मोजरी जुते महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे प्रदर्शन आणखी चार दिवस राहणार असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.