खासदार उदयनराजेंचा इशारा, राजकारण गजकरण झालयं,
प्रतिनिधी / सातारा
दुसऱयाचं आरक्षण काढून नको. हक्काचं जसं त्यांना आरक्षण दिलं तसंच आम्हालाही द्यावं, आमच्यावर अन्याय का?, अशी मराठा समाजाची मागणी आहे. सरकारचे कौतुक केले पाहिजे, सुप्रीम कोर्टात वकील हजर राहत नाही. ही कृती जाणीवपूर्वक केल्यासारखी आहे. लोकप्रतिनिधींनी मग ते कुठल्याही पक्षातील असतील त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोणी थांबवणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजेंनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला दिला. आमदार शिवेंद्रराजेंनी आरक्षणाच्या लढाईसाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. पुन्हा कोपर्डीसारख्या घटनेची वाट समाज पाहतो आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संस्थापक नरेंद्र पाटील यांनी तर सरकारवर कडाडून हल्ला केला.
स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित स्व. अण्णासाहेब पाटील फौंडेशनच्या उद्घाटन सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, संस्थापक नरेंद्र पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, रमेश पाटील, डॉ. प्राची पाटील, रमेश पोफळे, गोरख शिंदे, प्रतापसिंह पाटील, देवेंद्र लांभे, बापू क्षीरसागर, हनुमत पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पोपटराव देशमुख, डॉ. मधुश्री पाटील, नगरसेविका भारती पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उदयनराजे म्हणाले, स्व. अण्णासाहेब एखाद्या खेडय़ात जन्मले. त्यांनी मुंबईत कार्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन असंघटित कामगारांना एकत्र करुन चळवळ उभी केली. त्यांच्या कार्याला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच. मी नेहमी सांगतो आर्थिक निकषावर आरक्षण झाले पाहिजे. जेव्हा मंडल आयोग झाला तेव्हा मी दिल्लीला गेलो होते. पंतप्रधान व्ही. पी. सिंग असताना प्रो आणि अँटी लोक रस्त्यावर येऊन एकमेकांना कुऱहाडी, काठय़ा वार करत होते, मी माझं परखड मत सांगत असतो. केवळ सर्वच मराठा समाजाचे आमदार खासदारांबरोबर इतर समाजाच्या नेत्यांनी भेदभाव करणे हे चुकीचे आहे. मराठा समाजाला दुसऱयाचे काढून आरक्षण नको. जसं त्यांना दिले तसे आम्हाला हवं. आमच्यावर अन्याय का, अशी मागणी समाजाची आहे. बारकाईने विचार केला तर मराठा समाजात शेतमजूर घ्या, कष्टकरी घ्या, यांचे हाल होत आहेत. ऍडमीशनमध्ये असेल वा नोकरीत प्रमोशनमध्ये अन्याय होतो आहे. निवडणूका होतात, सत्ता येतात, जातात. जी लोक तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला साथ देत नसतील तर त्यांचे कौतुक करावे. सुप्रिम कोर्टात वकील हजर राहत नाहीत. जाणीवपूर्वक केल्यासारखे दिसून येत आहे. आता लोकांचा अंत बघू नका उद्रेक झाला तर थांबवणार कोण?, असा सवाल करत ते म्हणाले, नरेंद्रजींनी अण्णासाहेब पाटील फाउंडेशन स्थापन केले. एक विचार नजरसमोर ठेवला आहे. अण्णासाहेबांनी जो इतिहास रचला आहे, जे कार्य केले. ते आपण पहातो व्हेरी ग्रेट पर्सन होते. त्यांच्याबाबत सांगायला शब्द अपुरे पडतात, असे सांगत मराठा समाजाला काय उत्तर देणार मुळात हे कुठंतरी थांबलं पाहिजे. राजकारण गजकरण झालेले आहे. लोकांनी जीव दिले, मोर्चे काढले. तरीही हे लोकांच्या भावना समजून घेत नाही, अशीही सरकारवर टीका केली.
उदयनराजे-संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली एकत्र या-शिवेंद्रराजे
शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत असू द्या, महामंडळाच्या बाबतीत अतिशय तळमळीने काम केले. अण्णासाहेब कार्य सगळ्यांना ज्ञात आहे. मराठा आरक्षणाचा पाया स्व. अण्णासाहेब यांनी करून दिला. कुठंतरी आता कळस गाठतोय. हे होत असताना या कार्याला खोडा घालण्याचे काम राज्यात होतेय. मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षणापासून दूर ठेवले जाते. बघण्याच्या दृष्टीकोन राज्यकर्ते टोलवाटोलवीच करतात. कोपर्डीच्या घटनेनंतर प्रत्येक जिह्यात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आणखी कोपर्डीची घटना घडायची वाट पहातोय आपण एकत्र आले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या पक्षात राजकिय काम चालू ठेवावे पण चौकटी बाजूला ठेवून समाजासाठी खऱया अर्थाने लढले पाहिजे. छत्रपती उदयनराजे व संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एक आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले, हायकोर्टाने टिकवलं, पण दुर्दैवाने या सरकारच्या काळात सुप्रिम कोर्टात अडकलं आहे. आता राज्य सरकारवर दबाव निर्माण करून स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र पाटील यांची धडाडली तोफ
नरेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात सरकारवर जोरदार टीका करत अण्णासाहेब महामंडळाला निधी नाही. ज्या मराठा उद्योजकांनी कर्ज काढले आहे त्यांना त्रास झाला तर मी आहे अन् तुम्ही. एक लाख उद्योजक तयार करण्याचा संकल्प त्यांनी केला. सत्तेवर नसलो तरी गावोगावी जाईन, टार्गेट पूर्ण करेन,
मराठा उद्योजकांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून घेण्यात आलेल्या कर्जातून रुपाली जाधव, सीमा शिंदे, दत्ता धनावडे, अण्णासाहेब काटकर, संजय पाटील, सुशांत मोहिते यांचा सन्मान करण्यात आला.