प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मोठय़ा उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाने महाशिवरात्रीच्या सोहळय़ाची सांगता झाली.
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नितीन भातकांडे व परिवारातर्फे महाप्रसादाचे पूजन व वितरण करण्यात आले.
अंदाजे 40 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे यावषी एपीएमसी भाजीमार्केट व जयभारत किसान मार्केट येथे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भाजीमार्केटमधील व्यापारी महाप्रसादासाठी सहकार्य करतात. त्या व्यापाऱयांना महाप्रसाद पोहचावा या उद्देशाने कपिलेश्वर मंदिराकडून हा पायंडा घालण्यात आला आहे.
नेहरूनगर बसवाण्णा मंदिर
नेहरूनगर येथील बसवाण्णा मंदिर येथे बुधवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंदिर ट्रस्टचे सदस्य विश्वनाथ पाटील व शिवाजी ठक यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष तुकाराम पाटील, उपाध्यक्ष गंगाधर पाटील, दीपक बिर्जे, राकेश पेडणेकर, प्रवीण पाटील, महेश जुवेकर, दादू पाटील यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद झाला. अंदाजे 5 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शनिवार खुट, महादेव आर्केड
शनिवार खुट येथील महादेव आर्केड येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर अध्यक्ष गजेश नंदगडकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. यावेळी 4 हजार 500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील व्यापारी, नागरिक, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
एकदंत युवक मंडळ, समर्थनगर
समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळ व दुर्गाशक्ती महिला मंडळ, विनायक मार्ग यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, नगरसेविका नेत्रावती भागवत यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली. 1 हजार 200 हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकदंत युवक मंडळ व दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी महाप्रसादासाठी परिश्रम घेतले.
वाडा कंपाऊंड, वडगाव
वाडा कंपाऊंड, वडगाव येथील शिवमंदिरात मंगळवारी व बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यासाठी युवक मंडळांनी परिश्रम घेतले.