ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात आतापर्यंतची उच्चांकी कोरोना रुग्णवाढ झाली. राज्यात शनिवारी दिवसभरात 20,489 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 312 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 लाख 83 हजार 862 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 26 हजार 276 एवढी आहे.
शनिवारी दिवसभरात 10 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 6 लाख 36 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.01 % आहे. तर मृत्यू दर 2.97 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 45 लाख 56 हजार 707 नमुन्यांपैकी 8 लाख 83 हजार 862 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 81 हजार 909 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 196 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.