ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 14 हजार 123 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल तिसऱ्यांदा 20 हजार पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात 14 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यासह एकूण रुग्णांची संख्या 57 लाख 61 हजार 015 वर पोहोचली आहे.
तर राज्यात काल 477 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 96,198 जणांनी आपला जीव गमावला आहे. कालच्या दिवशी 35,949 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत एकूण 54 लाख 31 हजार 319 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात रुग्ण होण्याचे प्रमाण 94.28 % इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.67 % इतके आहे.
सद्य स्थितीत राज्यात 2 लाख 30 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात 17 लाख 68 हजार 119 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुणे शहरात 4,56,509 रुग्ण कोविडमुक्त!
पुणे शहरात मंगळवारी 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 858 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बधितांची संख्या 4,70,311 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 5 हजार 518 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 8,284 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.