ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 7 हजार 243 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 10,978 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 196 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 38 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.21 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,43,83113 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 72 हजार 645 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,74,463 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,607 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 12 हजार 231 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.