ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 9251 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 13 हजार 389 एवढा आहे.
शनिवारी दिवसभरात 7227 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 07 हजार 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 45 हजार 481 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 257 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.65 % आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.55 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 18 लाख 36 हजार 920 नमुन्यांपैकी 3 लाख 66 हजार 368 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 94 हजार 508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 44 हजार 603 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.