ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने व्हेंटिलेटर्सनंतर आता सॅनिटायझरच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मास्क आणि सॅनिटाझरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे महिंद्राने सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी देशात व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागल्याने महिंद्राने स्वस्तात व्हेंटिलेटर्सची निर्मिती करून उत्पादनाला सुरुवात केली. सरासरी 7 हजार 500 रुपयांत हा व्हेंटिलेटर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
व्हेंटिलेटर्सनंतर आता महिंद्रा सॅनिटायझरच्या उत्पादनात उतरली आहे. कंपनीच्या एका टीमने सॅनिटायझरच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्याच्या उत्पादनाचा परवाना मिळवला आहे. त्यानंतर कंपनीने ब्रँडेड सॅनिटायझरच्या उत्पादनाला सुरूवात केली आहे.