मांड्या/प्रतिनिधी
मांड्या लोकसभेच्या खासदार सुमलथा अंबरेश यांचा कोरोना अहवाल सोमवारी दि. ६ रोजी पिझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सुमलथा यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विट केली आहे. त्यांनी “कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोरोनाची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. तसेच मला घरी उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे म्हंटले आहे. शनिवारी (4 जुलै) त्यांना डोकेदुखी आणि घश्यात जळजळ होण्याचा त्रास जाणवू लागल्यांनंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
“देवाच्या कृपेने, माझी प्रतिकारशक्ती अधिक मजबूत आहे आणि मला खात्री आहे की मी लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने यातून बाहेर पडेन. तसेच मी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले आहे त्याचा तपशील मी शासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. असे सुमलथा यांनी म्हंटले आहे. खासदार डॉ. सुमालथा ह्या दक्षिण भारतीय अभिनेत्री असून त्या दिवंगत अभिनेते आणि राजकारणी अंबरेश यांची यांच्या पत्नी आहेत.