कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी साकारली कलात्मक प्रतिकृती
प्रतिनिधी / मसुरे:
आषाढीच्या ऐतिहासिक परंपरेत यंदा कोरोना संकटामुळे खंड पडला आहे. वारकरी, कष्टकरी आपल्या घरूनच पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत. कुडाळ तालुक्मयातील माणगावमधील शेतकऱयांनाही शेतात हरिनामाचा जप करताना विठ्ठल दर्शन झालंय! कमरेवर हात घेतलेल्या विठूरायाचे दर्शन भात शेतीच्या खाचरात करून दिलंय, ते केंद्रीय बालश्री पुरस्काराने सन्मानित दादर-मुंबई येथील कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी. कलात्मक पद्धतीने भाताच्या शेतात रुजून आलेल्या तरव्याची काढणी करत ही प्रतिकृती त्यांनी साकार केली आहे.
एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी यावर्षी आषाढी एकादशीही आल्याने कला दिग्दर्शक सुमित यांनी बळीराजाला त्याच्या शेतातच विठूराया दाखवून वेगळा कलाविष्कार समोर आणला आहे. एका शॉर्टफिल्मच्या शूटिंगसाठी कुडाळ येथे आलेल्या व लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडलेल्या सुमित यांनी यापूर्वी महाराष्ट्र दिनी ‘ग्रीन महाराष्ट्र’ ही संकल्पना राबवून कुडाळ येथे बनविलेली प्रतिकृती लक्षवेधी ठरली होती.
सुमित यांना कष्टकऱयांमध्ये झाले विठ्ठल दर्शन
सुमित यांना शेतकरी, कष्टकऱयांमध्ये विठ्ठलाचं दर्शंन झालं. हे विठ्ठलाचं रुप कॅमेऱयात टिपून, त्याला संगीतबद्ध करत आषाढीच्या निमित्ताने बनविलेला व्हीडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे. भाताची शेती हा कोकणातला प्रमुख व्यवसाय. पावसाने जोर धरला की इथे भात शेतीचे काम जोरात सुरू होते. भाताची पेरणी, पेरणीतून उगवणाऱया तरव्याची काढणी आणि लावणी हे गेले काही दिवस लॉकडाऊनमुळे कोकणात असलेल्या सुमित हे जवळून अनुभवताहेत.
शेत शिवारातून विठ्ठलाचे दर्शन
यावषी त्यांची वारी इथेच रंगायला लागली. पावसाच्या गाण्यांची जागा अभंगांनी घेतलेली त्यांनी पाहिली. टाळ, मृदुंगाच्या जागी भाताची पेंढ आता वाजू लागली. चिखलातल्या खेळांनी रिंगण रंगले आणि असे हिरवे विठ्ठलाचे रुप सुमित यांच्यामुळे अनुभवायला मिळाले आहे. माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिरनजीक बोरचाटे कुटुंबाच्या शेतात ही प्रतिकृती करण्यात आलीय. यासाठीचे ड्रोन शॉट्स मिलिंद आडेलकर, तर व्हीडिओ एडिट सौरभ नाईकने केला आहे. सागर कुडाळकर, साईराज राणे अशा कोकणी कलाकारांचा हा व्हीडिओ बनविण्यात महत्वाचा सहभाग लाभला आहे. कोरोनामुळे वारकऱयांचा पंढरीचा मार्ग बंद झाल्याने विठूरायाचे मुकलेले दर्शन सुमित पाटील यांच्यामुळे शेत शिवारातून निसर्गाच्या जवळ जाऊन होत आहे.