100 हून अधिक जखमी ः अवैध प्रवास अंगलट
लुआलाबा
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या आफ्रिकन देशामध्ये मालवाहतूक रेल्वे रुळावरून घसरल्याने किमान 60 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लुआलाबा प्रांतातील लुबुडी भागात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या मालगाडीतून लोक बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. मालगाडीच्या सात बोगी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाल्याचे काँगोमधील प्रांतीय अधिकारी जीन-सर्ज लुमू यांनी सांगितले. जखमींना लुबुडी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त मालगाडी मुनेदितू शहरातून लुबुम्बाशीला येथे जात होती.