अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूड पदार्पणासाठी उत्सुक
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना स्वतःच्या पुष्पा द राइज या चित्रपटामुळे देशभरात चर्चेत राहिली आहे. देशभरात या चित्रपटात मिळत असलेला प्रतिसाद पाहून ती भारावली गेली आहे. आपला आगामी हिंदी चित्रपट मिशन मजनूला देखील अशाचप्रकारचे प्रेम मिळेल अशी अपेक्षा तिला वाटत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्पाय थ्रिलर चित्रपट मिशन मजून आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या दोन्ही चित्रपटांशी मी जोडली गेलेली आहे. हे चित्रपट उत्तम चालतील अशी अपेक्षा आहे. 2022 हे वर्ष पुष्पाच्या प्रदर्शनासह उत्तम राहिले असल्याचे तिने म्हटले आहे.
मिशन मजनू हा चित्रपट 1970 च्या दशकावर बेतलेला असून भारताकडुन पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्वात साहसी मोहिमेवर तो आधारित आहे. याचे दिग्दर्शन शांतनू बागची यांनी केले आहे.
तर गुडबाय या चित्रपटाची कथा एका पिता-पुत्रीवर आधारित आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका यांच्यासह नीना गुप्ता, पावेल गुलाटी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.