ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. त्यातच आज पुन्हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत नव्या 20 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीत रुग्णांची एकूण संख्या 1984 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत गुरुवारी नवीन 20 रुग्ण सापडले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मागील काही दिवस या भागात रुग्ण साापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे लोकांनी निःश्वास सोडला होता. मात्र आज पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. तर आत्तपर्यंत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महापालिकेकडून धारावी भागात निर्जंतुकीकरण, ड्रोन द्वारे नागरिकांवर नजर ठेवणे आदी उपाययोजना सुरू आहेत. मात्र, आता लॉक डाऊन शिथिल करण्यात आले असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे.