ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यात मुंबई शहर तर हॉटस्पॉट बनले आहे. या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या पोलिसांना भोवती कोरोनाचा सर्वाधिक विळखा दिसून येत आहे.
आता पर्यंत मुंबई पोलीस दलातील 1871 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 853 पोलिसांनी या महामारी वर मात केली आहे. तर 21 जणांनी आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्र राज्यात 2 हजार 562 पोलीस कोरोनाग्रस्त आहेत. पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 34 वर पोहोचला असून 1431 जणांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई पोलीस दलातील 1871 जणांमध्ये 254 पोलीस अधिकारी आहेत. तर 853 पोलीस कर्मचाऱ्यांनी या महामारी वर मात केली असून 219 पोलीस पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित पोलिसांच्या प्रमाणात घट होत असली तरी संकट कायम आहे. त्यामुळे आता अधिक काळजी घेतली जात आहे.