कोयना धरण, चौथ्या टप्प्यास भेट देणार, जिल्हय़ात उत्सुकता
प्रतिनिधी / नवारस्ता
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच गुरूवार 10 रोजी सातारा जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. ठाकरे यांच्याबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच अन्य मंत्रीही कोयना धरण आणि चौथ्या टप्प्याची पाहणी करण्यासाठी येत असल्याने जिल्हावासियांची उत्सुकता शिगेस पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या दौऱयात जिल्हय़ाच्या राजकीय घडामोडीबाबत चर्चा होणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करीत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी प्रथमच सातारा जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. आघाडी सरकारमध्ये सातारा जिह्यातील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई हे दोन मातब्बर मंत्री आहेत. या दोन्हीही नेत्यांच्या दृष्टीने दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचा हा दौरा राजकीयदृष्टय़ा महत्वाचा मानला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
या दौऱयात मुख्यमंत्री ठाकरे हे थेट कोयनानगर येथे हेलिकॉप्टरने उतरणार असल्याने आणि त्यांच्या दौऱयातील कोयना विश्रामगृहातील दुपारी 12.30 ते 1.10 या मिळणाऱया राखीव वेळेत जिह्यातील अनेक राजकीय घडामोडीवर आणि विकासकामांवर खलबते होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिह्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा पहिला हवाई दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 8.45 वाजता मातोश्री निवास्थानापासून जुहू विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ते हेलिकॉप्टरने कोयनानगरकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता त्यांचे कोयनानगर येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्यांचे स्वागत करण्यासाठी पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई उपस्थित असतील.
आपल्या तीन तासांच्या सातारा जिल्हा दौऱयात पोपळी येथील जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा क्र 4 विद्युतगृहाची 10.50 वाजता पाहणी, त्यानंतर दुपारी 12.05 वाजता कोयना धरण परिसर पाहणी आणि त्यानंतर 12.40 ते 1.10 कोयना विश्रामगृह येथे राखीव असा त्यांचा दौरा असेल. त्यानंतर दुपारी 1.20 वाजता मुख्यमंत्री पुढे ओझर्डे जिल्हा पुणेकडे रवाना होतील.