ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढच चालला आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यानं मुंबई शहर रेड झोनमध्ये आहे. आता अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थ म्हणजेच वर्षा बंगल्यात तैनात असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिला अधिकारी वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वारावर तैनात होती. दोन च दिवसांपूर्वी तिची ड्युटी तेथे लावण्यात आली होती. या महिलेवर सध्या उपचार चालू असून या महिलेच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या वर्षा बंगल्यात कोणी राहत नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपल्या परिवारासह वांद्र्यात मातोश्री येथे राहतात.