ज्याचा माल त्याचा हमाल यावर चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाच्या पदाधिकाऱयांची उच्चस्तरीय बैठक मुंबई येथे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत वाहतुकदारांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूकदारांचा विषय कॅबिनेट बैठकीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत रस्ते करसवलत, व्यवसाय कर माफी, विद्यार्थी व धार्मिक प्रवासी वाहतूक वाहनांना करमाफी , कामगार वाहतूक करणाऱया बसेसना कर सवलत मिळावी. चेक पोस्ट वरील इमारतींचे ट्रॉमा सेंटर मध्ये रुपांतर करणे. ट्रक पार्किंग टर्मिनल उभारणी, प्रमुख शहरे व वळण रस्त्यावरील नो एंट्रीची कालमर्यादा कमी करणे. कालबाह्य केसेस रद्द करणे , पोलीसांचे अधिकार मर्यादित ठेवणे , ऑन लाईन दंड करताना स्थळ, काळ दर्शक 3 फोटो अपलोड करणे.
ज्याचा माल त्याचा हमाल यासाठी व्यापारी,उद्योजक, कारखानदार ,कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व शिखर संघटना यांना राज्यस्तरीय निर्देश देणे. , एसटी बसेस प्रमाणे माल वाहतूकदारांना हमाली वाराई लागू नाही. या परीपत्रकाची सर्वत्र व तातडीने अंमलबजावणी करणे. जिल्हा पातळीवर समन्वय समित्या स्थापन करणे .मोटर वाहन कायदा कलमानुसार मोटर भाडÎाची व्याख्या व किमान भाडे दर निश्चीतीबाबत शासन स्तरावरून निर्देश करणे या विषयांवर सखोल चर्चा झाली. चर्चेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाहतुकदारांच्या प्रश्नांबाबतच्या सुचना प्रशासनास देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंदर्भीय विषय कॅबिनेट बैठकीत घेण्याविषयी सुचना दिल्या. महासंघातर्फे प्रसन्ना पटवर्धन, प्रकाश गवळी, रमण खोसला,हर्ष कोटक , बाळासाहेब कलशेट्टी आदिंनी वाहतूकददारांच्या समस्या मांडल्या.