वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनची निवडणूक 18 डिसेंबरला घेतली जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे फेडरेशनच्या निवडणूक प्रक्रियेला तीन महिने विलंब झाला आहे.
गुरूग्राम येथे झालेल्या अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये निवडणूक घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेला दोन डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. फेडरेशनची निवडणूक गेल्या सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार होती पण कोरोना समस्येमुळे ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या अजय सिंग हे अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष असून ते स्पाईस जेट एअरलाईन्स कंपनीचे मालक आहेत. अजय सिंग पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असून त्यांना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते 48 वर्षीय आशिष शेलार यांच्याकडून आव्हान राहील.