वृत्त संस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल गेल्या काही दिवसापासून बॅडपॅच मधून जात असल्याने त्याची कामगिरी दर्जेदार होवू शकली नाही. सूर मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. आयपीएल स्पर्धेत बेंगळूर संघाकडून खेळताना मॅक्सवेलला पुन्हा सूर मिळाला असून त्याने याचे सर्व श्रेय कर्णधार कोहली आणि डीव्हीलियर्स यांना दिले आहे.
आयपीएल स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या दुसऱया टप्प्यात आपण सराव करीत असताना कोहली आणि डीव्हीलियर्स यांची आपल्याला साथ मिळाली. या दोन्ही महान खेळाडूंकडून आपल्याला अनुभवाचे धडे मिळाले. जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱया कोहली आणि डिव्हिलीयर्स यांच्याकडून आपल्याला बरेच काही शिकण्याची संधी मिळाली याबद्दल मॅक्सवेलने त्यांचे आभार मानले आहे.
नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मॅक्सवेलने 41.43 धावांच्या सरासरीने 290 धावा जमविल्या. आयसीसी विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना अबु धाबीत येत्या शनिवारी दक्षिण आफ्रिका संघाबरोबर होणार आहे.