वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी क्षेत्रातील कामगिरीचे दर्शन घडविण्यासाठी रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी आणि ब्लू मंकी फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येणाऱया ‘ध्यानचंद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे करणार आहेत.
ध्यानचंद हा चित्रपट अभिषेक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणार आहे. पुढीलवर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड लवकरच केली जाणार असल्याचे चौबे यांनी सांगितले. ध्यानचंद यांच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाने 1928 ऍमस्टरडॅम, 1932 लॉस एंजिल्स आणि 1936 बर्लीन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली होती.