प्रतिनिधी / मेढा :
जावली तालुका कोरोना मुक्त झाल्याने मेढा , निझरे यांसह एकुण 2 6 गांवाच्या लॉक डाऊनच्या अटी शिथील करण्यात आल्याने आज मेढा येथे नागरीकांची जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी मेढा बाजारपेठेत गर्दी केली होती.
निझरे येथील रुग्णांमुळे त्यांच्या संपर्कातील अन्य पांच जणांना कोरोनाची लागण झाली होती . हा आकडा वाढत जावू नये .व मेढा नगरपंचायत हद्दीतील नागरीकांबरोबरच , जावली तालुक्यातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे मेढा नगरपंचायत , तहसिलदार जावली यांनी केलेल्या शिफारशी नुसार 25 एप्रिलच्या रात्रीपासून मेढा , निझरे सह , परिसरातील एकुण 28 गांवे शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकायांनी काढला. आणि गांवाच्या वेशी पुन्हा बंद झाल्या. माणस गांवा गांवात घराघरात बंद झाली. बाहेर पडायचं झालं तरी ग्रामदक्षता कमिटीच पत्र असल्याशिवाय घरातून बाहेर पडता येत नव्हतं. दि. 6 मे रोजी दुपारीच जावलीत कोरोना मुक्तीची बातमी पोहचली आणि मेढा , निझरे सह 28 गांवे व संपूर्ण जावली तालुक्याने सुटकेचा श्वास सोडला.
जावली तालुक्यात निझरे गांव, व मेढा नगरपंचायती सह 26 गावामध्ये क्रिमीलर प्रोसीजर कोडचे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश 26 एप्रिल रोजी जारी केले होते. आता या मनाई आदेशातील तरतूदी फक्त म्हाते मुरा व म्हाते खुर्द या दोन गावांसाठीच लागू राहणार असून इतर गावांना लागू राहणार नाहीत, अशी माहिती सातारा उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, मिनाज मुल्ला यांनी जाहीर केल्याने तब्बल 11 बंद असणारी किराणा व जिवनावश्यक वस्तुंची दुकान सुरू झाल्याने नागरीकांनी सकाळी सकाळीच मेढा बाजारपेठेत खरेदी साठी गर्दी केली होती.
जावली कोरोना मुक्त झाला असला तरी , जिल्हा रेड झोन मध्ये असल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाया दुकानांनाच दुकाने सुरु करण्याची मान्यता असताना आज मार्केटमध्ये अन्य दुकानदारांनाही आपल्या दुकानाच शटर वर केल्याने अधिकायांची एकच तारांबळ उडाली. तहसिलदार शरद पाटील , गटविकास अधिकारी सतिश बुध्दे , नगरपंचायतीचे अधिकारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मार्केट मध्ये फिरून अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकानांना पुन्हा कुलपे लावण्यास सांगीतले. मार्केट मध्ये चारचाकी व दुचाकी वाहानांची वर्दळ वाढल्याने पोलीस यंत्रणेवर पुन्हा ताण पडला.