बेळगाव / प्रतिनिधी :
रेडक्रॉस संस्थेच्यावतीने बुधवारी बाळेकुंद्री खुर्द येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या महिलांना 200 हून अधिक मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजिक अंतर ठेवून काम करणे, हात धुणे, मास्क वापरण्याविषयी जागृती करण्यात आली.
यावेळी वैद्य शिवानंद, वैद्य सीमा, युवराज जाधव, शांतीनाथ चंदगडकर व महिला उपस्थित होत्या.