प्रतिनिधी / वास्को
मेर्सिस वाडे वास्को येथील एक वृक्ष कोसळण्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या वृक्षामुळे तेथील एका घराची हानी झाली.
मेर्सिस वाडे भागातील गॅस सिलिंडर गोदामासमोर अगदी रस्त्याच्याकडेला हा वृक्ष होता. हा वृक्ष रस्त्याच्या दुसऱया बाजुला असलेल्या दत्तेश साखरदांडे यांच्या मालमत्तेवर कोसळला. त्यात त्यांच्या घराचीही हानी झाली. सुदैवानेच लाखोंची हानी टळली. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कोसळलेल्या वृक्षामुळे निर्माण झालेला अडथळा दूर करण्याच्या कामाला सुरवात केली. दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱयांनी दुपारपर्यंत तो वृक्ष कापून साखरदांडे यांच्या मालमत्तेवरील धोका आणि रस्त्यावरील अडथळा दूर केला. दुपारी बारानंतर हा रस्ता वाहतुकीस सुरळीत झाला. या घटनेत आपल्या घराचे चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची माहिती साखरदांडे यांनी दिली.