तरुण भारत/ऑनलाइन टीम
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवारआहे.त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.दरम्यान सोमवारपासून राणे लपून बसल्याचे बोलले जात आहे.शिवसेना नेते तथा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.विधानभवनाच्या पायऱ्यावर बसुन म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवणारे आज लपून बसले आहेत. अशी खोचक टीका केसरकर यांनी नितेश राणेंवर केली आहे.
वाघाला घाबरुन की कोर्टाला घाबरुन लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. कोणी गुन्हा केला माहिती नाही पण जे लपून बसले आहेत ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसलेत असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.