सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संजय लीला भन्साळीचा चित्रपट आहे. संजयने नेहमीच दीपिका पदुकोणला पसंती दिली आहे. मात्र ‘गंगूबाई’मध्ये दीपिका नसल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. पण संजयला गंगूबाईमध्ये दीपिकाला घ्यायचं होतं. मात्र विशाल भारद्वाजच्या ‘सपना दीदी’ या चित्रपटात दीपिका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. गंगूबाईची भूमिकाही त्याच धाटणीची आहे. त्यामुळे दीपिकाला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नव्हत्या. याच कारणामुळे तिने गंगूबाई करायला नकार दिल्याची बाब समोर आली आहे.
Previous Articleसौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ
Next Article शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार