वार्ताहर / यड्राव
यड्राव ता. शिरोळ येथील रेणुका नगरमध्ये दारूच्या नशेत गटारात पडून युवकाचा मृत्यू झाला संदीप वासुदेव मांगलेकर वय वर्षे 32 राहणार शिरगावे मळा यड्राव असे युवकाचे नाव असून याबाबतची वर्दी सदाशिव किसन कोरवी वय वर्ष बत्तीस राहणार यड्राव यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
मयत संदीप मांगलेकर हा सदाशिव कोरवी यांचेकडे वही फनी कामगार म्हणून कामाला होता तो गेल्या दोन दिवसापासून दारुच्या नशेतच होता. आज दुपारी रेणुकानगर येथे लहान मुले खेळत असताना गटारीत कोणीतरी पडले असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिस पाटील जगदीश संकपाळ, होमगार्ड संदीप काळगे हे येऊन पाहिले असता गटारीत तोंड बुडलेल्या अवस्थेत एक युवक पडल्याचे निदर्शनास आले. त्याला सरळ करून पहिले असता संदीप मांगलेकर हा मयत स्थितीत आढळला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी गाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.