कहाणी एका शापित खूर्चीची
आपले जग अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. त्यांच्याशी संबंधित किस्से-कहाण्या लोकांमध्ये अत्यंत प्रचलित असतात. अशाच एका रहस्यमय खूर्चीवर जो कुणी बसला तो कुठल्या न कुठल्या कारणाने मारला गेल्याचे दावा करण्यात येतो. ही खूर्ची इंग्लंड किंवा फिलेडेल्फियाच्या एका संग्रहालयात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. या खूर्चीच्या भीतीपोटीच तिला जमिनीपासून अनेक फूटांच्या उंचीवर लटकविण्यात आले आहे, जेणेकरून त्यावर कुणी बसू नये. याचमुळे या रहस्यमय खूर्चीची देशविदेशात चर्चा केली जाते. मृत्यूची खूर्ची म्हणवून घेणाऱया या रहस्यमय चेयरचे अनेक किस्से आहेत.
ही खूर्ची थॉमस बस्बी नावाच्या एका व्यक्तीची होती. त्याच्या या पसंतीच्या या खूर्चीवर एकदा त्याचे सासरेच बसले होते. यामुळे संतप्त थॉमसने त्यांची हत्या केली होती. या हत्येमुळे थॉमसला फासावर लटकविण्यात आले होते. पण मृत्यूपूर्वी थॉमसने जो कुणी या खूर्चीवर बसण्याचे दुस्साहस करेल, त्याचा मृत्यू होईल असा शाप दिला होता. थॉमसच्या मृत्यूनंतर अनेक लोकांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही आणि या खूर्चीवर बसण्याची इच्छा दर्शविली. पण खूर्चीवर बसल्याच्या ाकही दिवसांमध्येच त्यांचा मृत्यू ओढवला आहे.
काही काळानंतर खूर्चीवर बसणाऱया आणखीन 4 लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा ही खूर्ची शापित असल्याचे लोकांकडून म्हटले जाऊ लागले. दुसऱया महायुद्धावेळी काही सैनिक या खूर्चीवर बसले होते. युद्धादरम्यान या सर्व सैनिकांचा मृत्यू ओढवला. आज देखील थॉमस बस्बीचा आत्मा या खूर्चीत असल्याचे बोलले जाते.
तेव्हापासून या खूर्चीला लोकांपासून दूर ठेवण्यात आले. ही खूर्ची आता एका संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. या खूर्चीला डेथ चेयर या नावाने देखील ओळखले जाते. या खूर्चीबद्दल प्रचंड भीती असल्याने संग्रहालयात देखील ती पाहणे लोक टाळतात.