काँग्रेस पक्षाच्या धडक मोर्चाचे नेतृत्व करणार
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाची मुलुखमैदानी तोफ, युवा नेते कन्हैया कुमार आज गुरूवार दि. 6 जानेवारीपासून दोन दिवसाच्या गोवा दौऱयावर येत आहेत. आज 6 रोजी संध्याकाळी 5 वाजता कन्हैया कुमार ‘बहुजन संवाद’ या कार्यक्रमात ओ.बी.सी, एस.सी, एस.टी. समाजातील प्रमुख नेत्यांशी म्हापसा टॅक्सी स्टॅंड येथे संवाद साधणार आहेत.
शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता एमसीसी हॉल येथे काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत ‘युवा स्पंदन’ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत राजभवनावरील धडक मोर्चाचे नेतृत्वही कन्हैया कुमार करणार आहेत.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्ये÷ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित असतील.
काँग्रेस पक्षातर्फे नाकर्त्या भाजप सरकारविरोधील आरोपपत्राची एक प्रत माननीय राज्यपालांनाही देण्यात येणार आहे. कन्हैया कुमार यांच्या दौऱयामुळे गोव्यातील युवा वर्गामध्ये स्फुर्तीचे वातावरण पसरले असून त्यांना भेटण्यास व त्यांचे मनोगत ऐकण्यास सारे उत्सुक आहेत.