वृत्तसंस्था/ मिलान
सिरी ए फुटबॉल स्पर्धेत युवेंटस संघाने सलग नववे विजेतेपद मिळविले. रविवारी या स्पर्धेतील झालेल्या जेतेपदाच्या लढतीत युवेंटसने सॅम्पडोरिआचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या रोनाल्डोने पूर्वार्धातील स्टॉपेज टाईमवेळी युवेंटसचे खाते उघडले. 66 व्या मिनिटाला फेड्रिको बेर्नरडेशीने युवेंटसचा दुसरा गोल नोंदवून सॅम्पडोरिआचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या विजयामुळे युवेंटस संघाने सलग नवव्यांदा ही स्पर्धा जिंकताना दुसऱया स्थानावर असलेल्या इंटरमिलान संघाला 7 गुणांनी मागे टाकले.