प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील मिरजोळे पाटीलवाडी येथील प्रसिध्द खेळाडू सुरज पाटील (वय ३६) याचे काल कोल्हापूर येथे निधन झाले. मिरजोळे ग्रामपंचायतीचे सदस्य, शिवसेना शाखा प्रमुख आणि कबड्डी असोसिएशनचे पंच म्हणून तो कार्यरत होता.
दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सुरजला कोल्हापूरला उपचाराकरिता आणण्यात आले होते. पंरतु काल उपचारादरम्यान सुरजचे कोल्हापूरतील डायमंड हॉस्पीटलमध्ये निधन झाले. रत्नागिरीमधील कबड्डी क्षेत्रातील गुणी खेळाडू, पंच व उपाध्यक्ष असुनही सगळ्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध ठेवणारा सुरज कोरोनाने गेल्याने गावात दु:खाचे सावट पसरले आहे. एका गुणवंत खेळाडूच्या जाण्याने रत्नागिरीच्या क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.