प्रतिनिधी / राजापूर
साखरी नाटे येथे कोरोना रुग्णाला आणण्यासाठी तसेच सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी तसेच पोलिसांवर हल्ला
वाहनांच्या काचा फोडल्या
साखरी नाटे येथे सोमवारी दोन कोरोना रुग्ण सापडले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गावात गेले असता तेथील जमावाने कर्मचाऱ्यांना गावात येण्यास विरोध केला त्यामुळे त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर हल्ला केला. यावेळी शासकीय वाहनांवर दगड फेक करण्यात आली. त्यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एक आरोग्य कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती उपलब्द झाली आहे.