प्रतिनिधी / खेड
तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमालीची घटत चालली आहे. गेल्या तीन दिवसात कोरोनाचा एकही रूग्ण न आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि: श्वास टाकला आहे.
तालुक्यात आतापर्यंत १३९६ कोरोनाचे रूग्ण आढळले असून १३०४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या ७ महिन्यात सर्वाधिक रूग्ण ऑगस्ट महिन्यात आढळले असून सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ३२ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असला तरी नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक असून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.