रत्नागिरी / प्रतिनिधी
जिल्ह्यात 70 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 70 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले 57 तर अँटिजेन टेस्ट केलेले 13 रुग्ण आहेत. यात दापोली तालुक्यात 2 रुग्ण, खेड 6, गुहागर 6, संगमेश्वर 11, रत्नागिरीत 29, लांजा 1, राजापूर 1, चिपळूण तालुक्यात 14 रुग्ण सापडले आहेत.
तर जिल्ह्यात मागील 24 तासात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 220 वर पोचली आहे. यात खेड तालुक्यात 1 तर रत्नागिरी तालुक्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.