प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजीव साळवी यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा झाली होती. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती बिघडत गेली व आज त्यांचे दुख:द निधन झाले.
संजू साळवी फोटोग्राफी क्षेत्रात नाव कमावले होते. रत्नागिरी बरोबर गोव्यातही त्यांचे फोटोग्राफी क्षेत्रात काम सुरू होत. मॉडेलिंग फोटोग्राफी क्षेत्रातही त्यांचे नाव होते. कॉलेज काळात त्यांनी अनेक ऑर्केस्ट्रामधून मिमिक्री व गायन केले होते. आज त्यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्वांना धक्का बसला संजीव साळवी यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.