आणखी तिघांचे बळी : मडगाव, वाळपई, पणजीतही फैलावात वाढ : आतापर्यंत 75 जणांना मृत्यू
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाने काल रविवारी आतापर्यंतची उच्चांकी संख्या गाठली. काल आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 506 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 2642 झाला आहे. काल तीन रुग्णांना मृत्यू आला तर 193 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मडगाव येथील स्थिती स्फोटक बनली असून रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. मडगावचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा 229 वर पोचला आहे. वाळपईची रुग्णसंख्या 104 वर पोचली आहे. पणजीची रुग्णसंख्या 95 तर म्हापशाची रुग्णसंख्या 97 झाली आहे. चिंबलची रुग्णसंख्या 109 झाली आहे.
वास्कोमधील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 395 झाली आहे. कुठ्ठाळीची रुग्णसंख्या 291 झाली आहे. फोंडामध्येही रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून 172 वर पोचली आहे. डिचोलीची रुग्णसंख्या 29 झाली आहे. सांखळीची रुग्णसंख्या 76, पेडणेची 54, हळदोणाची 20 झाली आहे. बेतकीची 20 तर कांदोळीची रुग्णसंख्या 71 झाली आहे. कासारवर्णेची 11, कोलवाळची 56 तर खोर्लीची रुग्णसंख्या 69 झाली आहे. शिवोलीची रुग्णसंख्या 21, पर्वरीची 60 व मयेची रुग्णसंख्या 24 झाली आहे.
कुडचडेची रुग्णसंख्या 49 झाली आहे. काणकोणची 24 झाली आहे. बाळ्ळीची 60, कासावलीची 51, चिंचिणी 7, कुडतरीची 67 व लोटलीची रुग्णसंख्या 42 झाली आहे. मडकईची रुग्णसंख्या 39, तर केपेची रुग्णसंख्या 52 झाली आहे. सांगेची रुग्णसंख्या 55, शिरोडा 36, धारबांदोडा 95 तर नावेलीची रुग्णसंख्या 56 झाली आहे.
प्रवाशांची योग्य कोरोना चाचणी होत नसल्याच्या तक्रारी
परराज्यांतून येणाऱयांची राज्याच्या सीमांवर कोरोना चाचणी योग्यप्रकारे होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच अनेकजण दुसऱया राज्यात जाऊन परत गोव्यात येऊ लागले आहेत. फक्त थर्मल गनद्वारे तपासणी करतात आणि सोडून दिले जाते. बसमधून किंवा अन्य वाहनांतून येणाऱया प्रवाशांचीही विशेष तपासणी होत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अशा प्रवाशांमध्ये कोरोना बाधित असला तर त्यापासूनही फार मोठा धोका संभवतो आहे.