ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील तीन वेगवेगळ्या राज्यात बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेघालयमध्ये, त्यानंतर काही तासांनी लेह लडाख आणि त्यानंतर थोड्या वेळात राजस्थान मधील बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
- सगळ्यात पहिल्यांदा मेघालयमध्ये भूकंप
सगळ्यात पहिल्यांदा मेघालयमधील पश्चिम गारो हिल्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी होती. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे.
- लेह – लडाखमध्ये भूकंप
लेह लडाखमध्ये आज पहाटे 4 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती.
- बिकानेरमध्ये जाणवेल धक्के
यानंतर सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी राजस्थानमधील बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टल स्केल एवढी होती. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.