प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकातील 142 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी बदल्यांचा हा आदेश जारी करण्यात आला असून बेळगाव येथील काही अधिकाऱयांचा यामध्ये समावेश आहे.
कॅम्पचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार डी. यांची आयएसडी विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सध्या गुप्तचर विभागात असलेले प्रभाकर एस. धर्मट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएसडी विभागातील श्रीशैल बॅकुड यांची बदली घटप्रभा पोलीस निरीक्षकपदी झाली आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातील एसव्ही विभागात सेवा बजाविणाऱया एच. डी. मुल्ला यांची बदली रायबाग पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सेवा बजावत असलेले निरंजन पाटील यांची बदली एसीबी विभागात करण्यात आली आहे.
बेळगाव जिह्यातील घटप्रभा, रायबागसह काही पोलीस स्थानकांचा दर्जा वाढविण्यात आला असून त्या पोलीस स्थानकांमध्ये आता पोलीस उपनिरीक्षकऐवजी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी काम पाहणार आहेत. बदल्यांची प्रक्रिया सुरूच आहे.