प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात मागील चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी कमी कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये 6,997 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 38 जणांचा बळी गेला आहे. मागील तीन महिन्यात दिवसभरात नोंद झालेली ही सर्वात कमी बळींची संख्या आहे. दरम्यान दिवसभरात 5,460 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 5,40,847 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4,37,910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 8,266 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 19 रुग्णांचा अन्य कारणामुळे बळी गेला आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 94,652 इतकी आहे. त्यापैकी 816 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.