बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच असून सोमवारी सुमारे 2 हजार 792 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना रुग्ण संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण समाधानकारक असून मागील 24 तासांत 1 हजार 964 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सोमवारी दिवसभरात 87 हजार 197 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर चाचण्यांच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 3.20 टक्के इतके आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात सध्या उपचारातील रुग्णसंख्या 23 हजार 849 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 89 हजार 804 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 लाख 53 हजार 416 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 12 हजार 520 जण कोरोनाने दगावले आहेत.
Previous Articleकोरोना : मुख्य सचिवांना आदेशपत्रक काढण्याचा अधिकार
Next Article सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीचे न्यायाधीशांना पत्र
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.