ब्रिटनमध्ये गेल्या अनेक शतकांपासून एक स्वारस्यपूर्ण घटना घडत आहे. ब्रिटनची राणी (किंवा राजघराणे) गेली आठशे वर्षे काही मालमत्तांचे भाडे वसूल करत आहे. तथापि, या मालमत्ता नेमक्मया कोठे आहेत? याची कुणालाही कल्पना नाही. त्या हरवलेल्या आहेत, असे बोलले जाते. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार या मालमत्तांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तथापि, त्यांचे नेमके स्थान कोणालाही माहीत नाही.
हे भाडे नुसते वसूल केले जात नाही तर चक्क समारंभपूर्वक दिले जाते. नुकताच ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये रॉयल कोर्ट ऑफ जस्टीस या संस्थेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जाहीररीत्या हे भाडे देण्यात आले. हे भाडे पैशाच्या स्वरुपातही असत नाही तर वस्तूंच्या रूपात असते. भाडे म्हणून एक चाकू, एक कुऱहाड, सहा घोडे, त्यांचे नाल आणि नाल मारण्यासाठी 61 खिळे अशा स्वरुपात हे भाडे देण्यात आले. ही प्रथा गेल्या आठशे वर्षांपासून सुरू आहे. इ. स. 1211 पासून राणी किंवा राजघराणे हे भाडे वसूल करत आहे. पहिली काही शतके या भाडोत्री मालमत्ता अस्तित्वात होत्या, असे म्हटले जाते. तथापि, आता त्यांचा काहीही थांगपत्ता लागत नाही. तरीही राणी भाडे वसूल करते. अशा तऱहेची घटना जगात अनोखीच मानावी लागेल, असे बहुतेकांचे मत आहे.