बुधवार दि 27 ऑक्टो ते मंगळ. दि 2 नोव्हेंबर 2021
दिवाळीपर्यंतचे महत्त्वाचे दिवस व त्याचे लाभदायक परिणाम
हिंदू धर्मीयांचा दिवाळी हा सण सर्वात मोठा आनंदाचा सण. या दरम्यानचे प्रत्येक दिवस अतिशय महत्त्वाचे व लाभदायक असतात. त्याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. दि. 28 गुरुपुष्यामृत योग या योगावर सोने खरेदी केल्यास कुटुंबात समृद्धी येते पण हा योग फक्त दिवसा महत्त्वाचा समजावा. सुवर्ण खरेदी सूर्यास्ताच्या आत करावी व सायंकाळी त्याचे शास्त्राक्त पूजन करावे दि. 29. मतभेद, भांडणे तंटे मिटविण्यास अथवा नष्ट करण्यास उत्तम. दि. 30 बुध केतू दोष दि. 31 दुपारी 1.16 नंतर राजयोग सर्व कामास उत्तम, दि. 1 नोव्हेंबर… रमा एकादशी वसुबारस. सायंकाळी सवत्स गायीची पूजा केल्यास मुलाबाळांच्या बाबतीत असलेल्या समस्या दूर होतात. दि. 2 गुरुद्वादशी धनत्रयोदशी यमदीपदान या दिवशी सायंकाळी दक्षिणेकडे वात करून दिवे लावल्यास यमापासून उद्भवणारे भय व संकट नाहीसे होते. तसेच कुबेर लक्ष्मी स्तोत्र वाचन व पूजन केल्यास लक्ष्मीची कृपा होते. दि. 3 शिवरात्री कुलधर्म घराण्यातील जे कुळधर्म कुळाचार असतील ते त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कुलदेवतेची कृपा राहते. सकाळी 9. 58 पर्यंत कार्य सिद्धी योग आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे काम करता येते. दि. 4 नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान. घरातील सर्व अडगळ, मनातील वाईट विचार, जे जे अनिष्ट आहे त्याचा त्याग करणे, असा नरकचतुर्दशीचा अर्थ आहे. त्या दिवशी सकाळी 7.42 पासून शुक्रवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटापर्यंत स्थिर योग आहे. या काळात केव्हाही लक्ष्मीपूजन करता येते. अमावस्या जोपर्यंत आहे तोपर्यंत केव्हाही लक्ष्मीपूजन करू शकता. त्यातही सूर्यास्तानंतर चोवीस 24 मिनिटापर्यंत पूजा सुरू केल्यास उत्तम. पण सिंह लग्न हवे असेल तर शुक्रवारी पहाटे 12.58 ते 0.35 या दरम्यान आहे. पूजा केव्हा व कोणत्या मुहूर्तावर केली याला महत्व नाही पण ती पूजा किती श्रद्धेने अथवा भक्तिभावाने केली याला महत्त्व आहे. घाईगडबडीत व कसे तरी लक्ष्मीपूजन करणे योग्य नाही. स्वतः श्रद्धेने जमेल तसे पूजन करा. लक्ष्मीची मूर्ती चांदी, सोन्याचे नाणे, अथवा श्री यंत्र यावर श्रीसूक्त 16 आवर्तनाने पंचामृत श्रीखंड व उपलब्ध फळाने अभिषेक. देवी सहस्त्रनामाने कुंकुमार्चन करण्याची खरी पद्धत आहे पण सर्वांनाच हे जमणे शक्य नाही.
मेष
कर्जातून मुक्तता नवे स्नेहसंबंध, नोकरीसाठी प्रयत्न आरोग्य सुधारणा, गुप्त शत्रू कमी होणे, बंधनमुक्तता सरकारी केसेस मधून बाहेर पडणे या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे, पण आपली बाजू बरोबर असणे आवश्यक आहे. वाहन चालविताना तरुण-तरुणींनी सावधानता बाळगावी. केतुचे भ्रमण आरोग्याला घातक आहे. एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर सध्या प्रयत्न करण्यास हरकत नाही.
वृषभ
नातेवाईक अथवा मित्रमंडळीं यांच्याकडून दगाफटका, कुणाला विश्वासाने दिलेली रक्कम अडकले असतील, साखरपुडा अथवा विवाहात अडचण येत असेल तर त्या संदर्भात सावध राहून कामे करावीत, काही कामे काही दिवस स्थगित ठेवणे योग्य ठरेल. ओळखीचा गैरफायदा घेऊन काहीजण नको ते प्रकार करण्याची शक्मयता आहे. महत्त्वाची कागदपत्रे अथवा वस्तू, फोन वगैरे कुणाच्या हाती पडणार नाहीत याची काळजी घ्या. चित्रपटक्षेत्राची आवड असणाऱया तरुण-तरुणींनी त्यातील धोके ओळखून त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक.
मिथुन
घाईगडबड अथवा चुकीच्या सल्ल्याने भगीरथ प्रयत्न करूनही कामे होत नाहीत. निष्कारण मनःस्ताप मात्र होतो. कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात अडकू नका. सध्या राहूचे भ्रमण अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. सर्व तऱहेच्या दुर्घटनेपासून जपा. गुप्त शत्रू तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतील. वारंवार वाहन बिघडत असेल, कर्ज वाढले असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क
काही लाभदायक योजना अथवा नवीन कामे मिळण्याची शक्मयता. एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी काही जण दबाव टाकतील. त्यामुळे मन शांत ठेवूनच निर्णय घेणे योग्य ठरेल. घाईगडबडीत काही निर्णय चुकू शकतात.तसेच आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहणे आवश्यक समजावे काही अपरिचित व्यक्ति कुटुंबातील ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याचा ब्लॅकमेलसाठी उपयोग करू शकतील. त्यामुळे कुटुंबातील अथवा तुमच्या खाजगी जीवनातील कोणत्या गोष्टी कुणा समोरही बोलू नका.
सिंह
ग्रहमान काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल आहे हाती घेतलेले काम होईलच असे नाही. नोकरी व्यवसायात अडथळे, वरिष्ठचा जाच, पगार वाढ न होणे, काम करूनही त्याचे चीज न होणे इतरांच्या कामाची जबाबदारी पडणे तसेच वारंवार नोकरी बदलण्याचा प्रसंग येणे असे प्रकार घडू. शकतात. किमती वस्तू. चोरीस जाऊ शकतील. सहज म्हणून एखाद्या केलेली मदत तुम्हाला अडचणीत आणू शकते.
कन्या
दिवाळी म्हणजे महत्त्वाची खरेदी आलीच पण आपली आर्थिक क्षमता पाहूनच खर्च करणे योग्य ठरेल. ऐनवेळी कुठेतरी पैसे अडकू शकतात. पेडिट कार्डाची समस्या होऊ शकते. एखाद्या मित्र-मैत्रिणीला दिलेले वाहन दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही नातेवाईक, मित्रमंडळी अथवा नवख्या व्यक्तींना तूर्तास घरी येण्याचे आमंत्रण देऊ नका. त्याचे कारण नंतर तुम्हाला आपोआप समजेल.
तूळ
अष्टमातील राहूच्या दूष्प्रभावामुळे प्रवासात अडथळे अपघात, दुर्घटना गैरसमज, मंगल कार्यात विघ्ने व प्रति÷sला धोका होण्याची शक्मयता. हुंडा अथवा देणे घेण्याच्या बाबतीत. सासरच्या लोकांकडून त्रास असे प्रकार घडू शकतात. शनि मंगळाच्या प्रभावामुळे पोट व नेत्रदोष निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. काही जणांच्या बोलण्याला भाळून इतर मार्गाने अर्थार्जन करण्याकडे मन वळेल. महिला वर्गाने मोबाईलवर बोलताना विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक
कोणत्याही बाबतीत तडजोड करताना आपले करिअर बिघडणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. नको त्या गोष्टी करण्याकडे मन वळण्याची शक्मयता. मदतीचे आश्वासन देणाऱया व्यक्ती अचानक शब्द फिरवतील. विवाहाची बोलणी सुरू असताना बोलण्याच्या ओघात खऱया बाबी उघड होतील त्यामुळे गहजब माजण्याची शक्मयता. वस्तुस्थितीच्या बाहेरील कोणत्याही गोष्टी मित्र-मैत्रीणीसमोर बोलू नका. घराण्यात जर काही अडचणी येत असतील तर मुक्मया प्राण्यांचे संवर्धन अथवा त्यांचे पालन पोषण करा बऱयाच अडचणीतून सुटका होईल.
धनु
ग्रहमान विचित्र योगात आहे. काही महत्त्वाच्या प्रसंगी अप्रिय घटना घडू शकतात. त्यासाठी सावधानता बाळगावी. प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती बरोबर असेलच असे नसते. त्यामुळे काही निर्णय स्वतःच्या मनाने घेणेच योग्य ठरते. या आठवडय़ात काही महत्त्वाच्या बाबतीत किचकट समस्या उद्भवतील पण त्यातून योग्य मार्ग निघेल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे फसवणूक प्रवासात झालेले नुकसान अशा गोष्टीतून सुटका होऊ शकते.
मकर
कष्टाने तुम्ही केलेली प्रगती न पहावल्याने जवळची माणसे अथवा आपले म्हणणारे काहीजण शत्रुत्व करू लागतील. काही पाळीव प्राणी तसेच मुलाबाळांच्या बाबतीत आजूबाजूच्या लोकांकडून तक्रारी येतील. हाती पैसा न टिकणे मुक्मया प्राण्यांचे बळी व तत्सम प्रकारातून निर्माण झालेले दोष. नातेवाइकांकडून फसवणूक असे प्रकार घडण्याची दाट शक्मयता. जिवलग मित्र-मैत्रिणी ऐनवेळी दगा देतील.
कुंभ
एकाच वेळी अनेक जबाबदाऱया घेणे अथवा सर्व काही मीच करीन. मला काहीही अशक्मय नाही अशा भ्रमात राहू नका. प्रसंगी मनात नसतानाही काही लोकांच्या पाया पडावे लागते याचा अनुभव येईल. चुकीचे नियोजन व इतरत्र लक्ष यामुळे ठरलेली कामे वेळेत होतील, असे नाही. त्यामुळे जे शक्मय आहे तेवढे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत पण तरी सुद्धा चैनीवृत्ती वर लगाम आवश्यक. विवाहाच्या वाटाघाटी सुरु असतील तर कोण काय बोलतो याकडे लक्ष ठेवा.
मीन
थट्टामस्करी अथवा एखादा चुकीचा शब्द ठरलेल्या लग्नात मोडता घालू शकतो घर, वाहन खरेदी, करण्यास अनुकूल काळ आहे. व्यवसायात बऱयाच गोष्टी मनासारख्या घडू शकतात. मनात शंका ठेवून केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही. त्यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करून मग त्यात हात घालावा जे काम कराल ते हमखास यशस्वी होईल. किरकोळ नुकसानीकडे फारसे लक्ष देऊ नका, कुणाच्याही घरी गेल्यास त्यांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका.