13 ते 19.2.2022 पर्यंत
राशींचा देश टॅरोचा संदेश
मेष
या आठवडय़ातील भाग्यवान रास असे म्हणता येईल. कर्तृत्वाला नवे पंख मिळतील. नवीन प्रेजेक्ट हाती येईल. पण याचबरोबर उतावळेपणा आणि घाईगडबड टाळावी लागेल. घरात विरोधाभासी वातावरण असेल. काही सदस्य तुम्हाला साथ देतील तर काही विरोध करतील. पैशाच्या दृष्टीने आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जीवनात समाधान असेल. लाल हातरुमाल जवळ ठेवावा.
वृषभ
कामाच्या स्वरुपात बदल आणि आध्यात्मिक अनुभव देणारा आठवडा आहे. नातेसंबंधांना परखण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्हाला व्यक्त होण्याला काही अडचण येत नाही. समस्यांशी दोन हात करणे हा तुमचा स्वभाव आहे पण या आठवडय़ात संयम बाळगा. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. लवमेट्सनी आणि विवाहितांनी परस्परांच्या मतांचा आदर करावा. कामाला जाताना लवंग खाऊन जावे.
मिथुन
टॅरोचा तुम्हाला संदेश आहे की अनेक संधी, अनेक पर्याय तुम्हाला मिळणार आहेत. सध्या गरज आहे ती संयमपूर्वक वाट बघण्याची. थोडय़ा फायद्याकरता पुढे मिळणाऱया मोठय़ा नफ्याला लाथाडण्यात काहीच अर्थ नाही. आर्थिक बाबतीत जरी आता नाराज असलात तरी पुढे फायदा नक्की आहे. लवमेट्सनी नात्याला गंभीरपणे घेण्याची गरज आहे. स्वच्छता कर्मचाऱयांना आदरपूर्वक भेटवस्तू द्यावी.
कर्क
हा आठवडा तुम्हाला तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ मिळवून देणारा आहे. या आठवडय़ात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. शाबासकी मिळेल. याचबरोबर तुम्हाला मदत केलेल्या लोकांच्या उपकाराची जाणीवदेखील तुम्ही ठेवली पाहिजे हा संदेश आहे. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. लवमेट्स प्रेमपूर्वक वागतील. दिव्यांग व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी.
टॅरो उपायः घरातील भांडणे, नैराश्य, अपयश, सतत आजारपण हे दूर करण्याकरता काचेच्या बाटलीत 7 चांभारचुका, तांदूळ, 7 लवंग, मीठ हे गच्च भरून दिसू नये, अशा ठिकाणी ठेवा.
सिंह
ज्या अडचणीतून, ज्या संकटांमधून तुम्ही पूर्वी गेला आहात, या आठवडय़ात तुम्ही दुसऱयांना त्या अडचणीतून आणि संकटांमधून सोडवण्याचा प्रयत्न कराल. या आठवडय़ात तुमच्या सल्ल्यामुळे लोकांचे कल्याण होईल. हे करत असताना मात्र स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. पैशाच्या आणि वैवाहिक सुखाच्या दृष्टीने सर्वसामान्य आहे. हिरव्या शाईचे स्वस्तिक जवळ ठेवा.
कन्या
कन्या राशीकरता टॅरोचा संदेश हा आहे की कोणत्याही परिस्थितीत दुसऱयांवर टीका करणे, एखाद्याची निंदा करणे, पाठीमागे बोलणे हे या आठवडय़ात कटाक्षाने टाळले पाहिजे. हा आठवडा उलटपक्षी स्वतःमधील अवगुण कसे दूर करता येतील हे पाहिले पाहिजे. आर्थिक परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. तलावातील माशांना खाणे घाला.
तुळ
हा आठवडा बदल सुचवत आहे आणि हा बदल चांगला की वाईट हे तुमच्या स्वीकारण्यावर अवलंबून आहे. या आठवडय़ात इतरांची मदत घेण्यास किंवा इतरांचा सल्ला ऐकण्यास कमीपणा समजू नका. पैशांच्याबाबतीत सावध रहा. कौटुंबिक संबंध मजबूत करण्याकडे लक्ष द्या. लवमेट्सनीसुद्धा धोक्मयापासून सावध रहावे. वृद्ध व्यक्तीला मदत करा.
वृश्चिक
नवीन नातेसंबंध जुळून येतील. ओळखीतून फायदा होईल. जुन्या वादातून मुक्तता मिळेल. काळजीपूर्वक निर्णय घेतल्याने वादाचे प्रसंग टळतील. नात्यात पारदर्शकता ठेवा म्हणजे कोणताही गैरसमज होणार नाही. लवमेट्स करता अनुकूल काळ आहे. जे सिंगल आहेत त्यांना आशादायक काळ आहे. जखमी जनावरांवर वैद्यकीय उपचार करावा.
धनु
अधिकार वाढ आणि पदोन्नती सुचवणारा हा आठवडा आहे. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा आहे. आपल्या ज्ञानाचा, आपल्या हुशारीचा उपयोग आपल्या बरोबरच दुसऱयालाही व्हावा याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक प्रसन्नता असेल. लवमेट्सनी अरेरावी टाळावी. धार्मिक स्थळी सेवा करावी.
मकर
आयुष्यात चांगले बदल घडणार असून ते मनापासून स्वीकारावेच असा टॅरोचा संदेश आहे. या आठवडय़ात काही निर्णय बदलावे लागतील पण ते फायद्याचेच ठरेल. काही जुन्या गोष्टींचा अंत झाल्याशिवाय नवीन गोष्टी सुरू होत नाहीत याची जाणीव ठेवावी. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. लवमेट्सनी दुरावा टाळावा. निळा हातरुमाल जवळ ठेवावा.
कुंभ
या आठवडय़ात एखाद्या बातमीमुळे मोठे बदल घडू शकतात. घरातील किंवा घराबाहेरील वाद चर्चेने, सामंजस्याने सोडवण्याकडे भर द्या. तडजोड झाल्यामुळे फायदा होईल. आर्थिक बाबतीत एखाद्या व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. लवमेट्सनी आवाजांचा कोंडमारा टाळावा. वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. सायंकाळी घरी लोबान धूप लावा.
मीन
कुटुंबातील किंवा मित्रपरिवारापैकी एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असल्याने तुम्हाला त्याची मदत करावीशी वाटेल. त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्नदेखील कराल. घर खरेदी, विक्री किंवा संपत्तीची वाटणी यादृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला ऐका. लहान मुलीला पैंजण भेट द्या.