दिल्ली/प्रतिनिधी
देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ते कर्नाटक व आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत.
राष्ट्रपती ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बेंगळूरला रवाना होतील. त्यांनतर ते ५ फेब्रुवारी रोजी बेंगळूरच्या येळहंका येथील हवाईदलाच्या तळावरील एअरो-इंडिया-२१ च्या समारोप सोहळ्याला संबोधित करतील. कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यांतील माडिकेरी येथे ते ६ फेब्रुवारी रोजी जनरल थिमय्या यांच्या वडिलोपार्जित जुन्या घरात केलेल्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. तसेच बेंगळूर येथील राजीव गांधी आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या २३ व्या वार्षिक पदवीदान सोहळ्याला ते ७ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहतील. त्याच दिवशी नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते मदनपल्लीच्या सत्संग फाउंडेशनच्या आश्रमाला व आंध्र प्रदेशातील सादम येथे भेट देतील.