प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापिठाचे वाणिज्य संशोधन आणि अभ्यास केंद्र व राणी चन्नम्मा वाणिज्य व्यवस्थापन महाविद्यालय शिक्षण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापिठाचे कुलगुरू रामचंद्र गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन एस. के. तगारे होते.
प्राचार्य डॉ. एच. एच. वीरापूर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एच. वाय. कांबळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. डॉ. सी. आर. गुडसी यांनी मनोगत व्यक्त केले. एस. आर. एफ. जीसीसीचे प्राचार्य डॉ. एम. जयपान्नी यांनी आभार मानले. या कार्यशाळेमध्ये बेळगावसह विजापूर, बागलकोट जिल्हय़ातील अनेक व्याख्याते सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक गॅमा नाईक, डॉ. एम. एल. लमाणी, आर. निरलकेरी यासह महाविद्यालयांचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपा तंगणकर व अश्विनी नाईक यांनी केले.