प्रतिनिधी /बेळगाव
शेख शिक्षण महाविद्यालयाच्या (बी.एड्.) प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांना ‘आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व हेल्थ ऍन्ड नेचर डेक्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल डॉ. सुतार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 5 सप्टेंबर रोजी चिकोडी येथे होणार आहे. माजी खासदार अमरसिंग पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. डॉ. सुतार या मागील 12 वर्षांपासून शेख शिक्षण महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन शैक्षणिक विषयावर अनेक लेखांचे सादरीकरण केले आहे. त्यांनी 2018 मध्ये ‘उत्कृष्ट प्राचार्य’ हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठात अकॅडमी कौन्सिलच्या सदस्या म्हणून 2021 मध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे.