वृत्तसंस्था/ नवी दिल्ली- रायपूर
छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या परिसरातील नऊ कनिष्ठ महिला हॉकीपटूंची राष्ट्रीय कनिष्ठांच्या महिला हॉकी चाचणी शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. मैदानाच्या उणीव असल्यामुळे निवड करण्यात आलेल्या या नऊ कनिष्ठ महिला हॉकीपटूंना हेलीपॅडवर प्रशिक्षण देण्यात आले होते.
नक्षलवाद्यांच्या या परिसरातील वरील निवड झालेल्या 14 ते 17 वर्षे वयोगटातील कनिष्ठ महिला हॉकीपटूंनी चार वर्षांपूर्वीच आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता. कनिष्ठ गटातील या महिला हॉकीपटूंना निमलष्करीदल आणि इंडो- तिबेटियन सीमा सुरक्षा पोलीसदलातर्फे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. 41 व्या बटालियनतर्फे आयोजित केलेल्या इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा पोलीसदलातर्फे नक्षलवाद्यांच्या परिसरातील आदिवासीच्या नऊ महिला कनिष्ठ हॉकीपटूंना हॉकीचे प्रशिक्षण सुरू होते. आता या नऊ आदिवासी कनिष्ठ महिला हॉकीपटूंची हॉकी इंडियातर्फे घेण्यात येणाऱया उपकनिष्ठ आणि कनिष्ठांच्या राष्ट्रीय निवड चांचणी शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती इंडो-तिबेटियनश सीमा सुरक्षा पोलीसदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. 2016 पासूनच या कनिष्ठ महिला हॉकीपटूंना हॉकीचे प्रोत्साहान देण्यात आले होते. हॉकी इंडियाच्या या आगामी निवड चांचणी सराव शिबिराला चालू महिन्यांच्या अखेरीस प्रारंभ केला जाणार असून निवड करण्यात आलेल्या छत्तीसगडच्या या नऊ कनिष्ठ महिला हॉकीपटूंना हॉकी इंडियातर्फे कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात आली आहेत.