नवी दिल्ली
सौदी अराम्को ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लि.च्या तेलापासून रसायन (ओ2सी)व्यवसायामधील 20 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. यासंदर्भात भारतात होणारी ही सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक ठरणार असल्याचे सध्यातरी सांगितले जात आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट 2019मध्ये जगातील सर्वात मोठी तेल निर्यात कंपनी ओ2सी प्रकल्पातील 20 टक्क्यांची हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली होती. यामध्ये गुजरातमधील जामनगरमधील दोन रिफायनरी आणि पेट्रोरसायन मालमत्तेचा समावेश आहे. त्यानंतर सौदीच्या अराम्कोने यात गुंतवणूकीस रस दाखवला होता. सदरचा व्यवहार हा मार्च 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता, परंतु त्यास काहीसा उशीर झाल्याची नोंद आहे. सौदीची कंपनी अराम्को लवकरच आर्थिक व्यवहाराबाबतचे पुढचे पाऊल उचलणार असल्याचे समजते.