प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण मागील दोन वर्षांपासून केले जात आहे. मुख्य इमारतीसह इतर इमारती पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधा असणाऱया इमारती उभारल्या जात आहेत. मंगळवारी स्टेशनरोड येथील जुनी इमारत जेसीबीने पाडली. त्याठिकाणी नवी इमारत बांधली जाणार असल्याची माहिती कर्मचाऱयांनी दिली.
मंगळवारी सकाळपासून पोस्टमन सर्कल येथून रेल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग काहीकाळ रोखण्यात आला होता. इमारत जेसीबीने पाडली जात असल्याने वाहतूक वळविण्यात आली. इमारतीचे साहित्य बाहेर काढण्यात आले. याठिकाणी नवे बांधकाम केले जाणार आहे. बेळगावमध्ये हायटेक रेल्वेस्थानक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या वर्षाअखेर पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.